राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री रवींद्र पवार यांच्यावर पक्षाने दिली महत्त्वपूर्ण जबाबदारी

Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने सरचिटणीस श्री. रविंद्र पवार यांची स्थानिक स्वराज्य निवडणूक ते लोकसभा निवडणुकीपर्यंत उमेदवार नेते यांच्याशी समन्वय, राज्य निवडणूक आयोगाशी समन्वय, दिल्ली एनसीपी कार्यालय समन्वय आणि पॅरेन्ट बॉडी समन्वय या महत्वाच्या जबाबदा-या पार पाडण्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार मिलींद अण्णा कांबळे उपस्थित होते.
रवींद्र पवार हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तसेच अत्यंत अभ्यासू, वैचारिक आणि जनसंपर्क असलेले नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई महानगरपालिकेचे ते गटनेते होते. मुंबई महापालिकेमध्ये अनेक वर्ष ते नगरसेवक होते. त्यांनी नगरसेवक असताना अनेक सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली व त्यांना न्याय मिळवून दिला. श्री रवींद्र पवार यांच्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली असून ही जबाबदारी रविंद्र पवार हे पार पाडतील अशी सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना खात्री आहे . श्री रवींद्र पवार यांना नव्याने महत्वपूर्ण जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचं अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. रविंद्र पवार यांना जबाबदारी मिळताच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *