आमदार गणपत गायकवाड यांची उल्हासनगर येथील पालकांच्या उपोषणाला भेट…सर्व प्रश्न तातडीने सोडवावे असे शिक्षण प्रशासनाला दिले निर्देश…

Share

उल्हासनगर: उल्हासनगर-४ मधील नेताजी चौक येथील न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने शालेय शुल्कात अचानक ४ हजार पासुन १५ ते २० हजार पर्यत भरमसाठ फी वाढ केलेली असुन शाळा प्रशासन पालकांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व पालक हे दि.१२/०७/२०२३ पासून शाळेसमोर साखळी उपोषणास बसलेले आहेत.

आज उपोषण स्थळी भेट देऊन पालकांच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच शाळा प्रशासने केलेली मनमानी फी वाढ रद्द होईपर्यंत आपल्या सोबत असेन असा शब्द यावेळी दिला, तसेच यावेळी शिक्षण अधिकारी सौ.ललिता दहितुले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधुन तातडीने यात लक्ष घालून फी वाढ रद्द करण्याबाबत निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *