कल्याण : मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. यावेळी विठ्ठलवाडी, साई नगर, जाईबाई विद्यामंदिर परिसर, शिवाजीनगर, वालधूनी येथील कल्याण पूर्व चे आमदार गणपत गायकवाड यांनी परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला व पुरग्रस्तांशी संवाद साधला.आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांना जेवणाचे वाटप करण्यात आले.पाणी शिरलेल्या परिसरातील स्थानिक नागरिकांची जवळच्या शाळांमध्ये तात्पुरता स्वरूपात निवाऱ्याची सोय केलेल्या शाळेची पाहणी केली.
तसेच महापालिकेच्या आपात्कालीन विभाग तसेच प्रभाग क्षेत्र अधिकारी तत्काळ पाचारण करुन महापालिका अधिकार्यांना परिस्थितीवर पुर्ण लक्ष ठेवुन योग्य उपाय योजना करण्याच्या सुचना केल्या.
१८ व १९ जुलै रोजी सतत पडणार्या पावसामुळे कल्याण पूर्व मतदारसंघातील वालधुनी नदीपाञाच्या पाणी पातळी मध्ये दुपार पासुन मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, त्यातच विठ्ठलवाडी स्मशानभुमी जवळील ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने पाण्याचा प्रवाह मंदावुन आजुबाजुच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती याची माहिती मिळताच याबाबत ५/ड प्रभाग क्षेञातील महापालिकेच्या आपात्कालीन विभागास आमदार गणपत गायकवाड यांनी तत्काळ पाचारण करुन जेसीबीच्या सहाय्याने संपुर्ण कचरा काढुन घेतला, ज्यामुळे पाण्याच्या पातळीत घट होण्यास सुरुवात झाली.यावेळी विभागातील पाणी शिरलेल्या नागरिकांसोबत आमदार यांनी संवाद साधला व महापालिका अधिकार्यांना परिस्थितीवर पुर्ण लक्ष ठेवुन योग्य उपाय योजना करण्याच्या सुचना केल्या.
