विष्णुनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांचा केला सत्कार….

Share


डोंबिवली: विष्णुनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन के. खांदारे यांची पदोन्नती होऊन त्यांची विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल डोंबिवलीतील सामाजिक राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कल्याण – डोंबिवली जिल्ह्याचे नेते माणिकराव उघडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शिवाजीराव वाठोरे, भीमराव पट्टेकर, रिक्षा युनियनचे नेते संजय पवार, प्रभाकर मोरे, चेतन मुळे, सतीश दप्तरे, बंडू धबाळे, प्रभू मोरे उपस्थित होते. यावेळी निर्णायक एल्गारचे संपादक दादाभाऊ अभंग यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांचा सत्कार करताना विष्णू नगर पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या नागरिकांना योग्य ते न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच रिपब्लिकन नेते माणिकराव उघडे यांनी मोहन खांदारे यांचा सत्कार करताना आपल्या मनोगत म्हटले की आम्ही केवळ गोरगरिबांची, वंचित घटकांची कामे घेऊन येत असतो, श्रीमंताची कामे घेऊन येत नाही. गोरगरीब झोपटपट्टीतील नागरिक, वंचित या लोकांना जसा यापूर्वीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी न्याय दिला तसा आपणही न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त केली. विष्णू नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *