(डोंबिवली) कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांचे दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी २४ जुलै सकाळी ११.०० वाजता डोंबिवली येथील स्मशान भूमीत झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे माजी खासदार संजय दिना पाटील, कल्याण – डोंबिवली महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक होते. त्यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली होती. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले यांचे नाट्यगृहाला नाव देण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. जनतेशी त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याविषयी अनेक मान्यवरांनी शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी,मुली, मुले व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
