मुंबई: माजी आमदार टी.एम. कांबळे यांनी वंचित, उपेक्षित, कामगार शेतकरी, मजूर या घटकासाठी संपूर्ण आयुष्य काम केले आहे व हाच विचाराचा वारसा घेऊन त्यांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांचं कार्य पुढे केले जाईल व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कनिष्क टी. कांबळे यांनी मुंबईमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी मनोगत व्यक्त केले. मंगळवार दिनांक २५ जुलै २०२३ रोजी पक्षाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात रवींद्र कांबळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या पक्षात प्रवेश केला. रवींद्र कांबळे यांच्यासारखा एक युवा हाडाचा कार्यकर्ता पक्षाला मिळाला असल्यामुळे मुंबईमध्ये ते पक्षाची मजबूत बांधणी करतील आणि उपेक्षित, वंचित, घटकांना न्याय देण्याचा काम रवींद्र कांबळे करतील असा आशावाद कनिष्ठ कांबळे यांनी व्यक्त केला. रवींद्र कांबळे रिपब्लिकन चळवळीतील अत्यंत तळमळीचे व अन्याय अत्याचार विरोधामध्ये लढणारा युवा नेता असून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं आहे. राजकीय पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करता यावी म्हणून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) राष्ट्रीय उपाध्यक्ष कनिष्क टी.कांबळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरिभाऊ कांबळे उपस्थित होते.
रवींद्र कांबळे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यात महादेव आवळे, अनिकेत होडे , अनिल जाधव, संदीप कांबळे, प्रकाश कदम, जयवंत जाधव, विश्वास पवार, शशिकांत खरे, विशाल पवार, अनिल तांबे, जमाप्रसाद दुबे, संतोष शर्मा, मिलिंद माने, रवींद्र सप्रे, कैलास अहिरे, गणेश मोरे, प्रशांत सांगळे,इम्रान शेख, देवेंद्र पाटील, राजू माने, प्रकाश खापरे, अजय गमरे, अर्जुन यादव, संदीप जावळे, शुभम कांबळे,अतिश कांबळे, भिवा मिस्त्री, विघ्नेश जेजूरकर, विकास मांजरे, अनंत पवार, हेमंत ठाकूर, विजय तांबे, सुमित मोहिते, सुशील सकपाळ, मंगेश सकपाळ या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला या सर्वांचे स्वागत कनिष्क कांबळे यांनी केले शेवटी रवींद्र कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नंदाताई टी. कांबळे व राष्ट्रीय उपाध्यक्ष कनिष्क टी. कांबळे यांनी माझ्यावर मुंबई प्रदेश अध्यक्ष पदाची जी जबाबदार दिली. त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे ते सार्थ करण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत करून पक्षाच्या आदेशानुसार मुंबईत पक्ष बांधणी करील.मुंबई मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) हा पक्ष उपेक्षित, वंचित घटकांसाठी लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील अशा प्रकारचं रविंद्र कांबळे यांनी आभार मानताना आपले मनोगत व्यक्त केले.
