
डोंबिवली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त डोंबिवली शहरांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी ९.०० ते ११.०० वाजता भव्य रक्तदान शिबिर, सकाळी ११.०० वाजता शास्त्री नगर हॉस्पिटल येथील रुग्णांना फळे वाटप व सायंकाळी ६.०० वाजता ज्येष्ठ शिवसैनिक यांचा जाहीर सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या डोंबिवली पश्चिम शाखेत आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी श्री.सदानंद थरवळ (जिल्हाप्रमुख, कल्याण लोकसभा) श्री. प्रकाशभाऊ शामराव तेलगोटे (विधानसभा शहर संघटक), श्री. किशोर मानकामे (डोंबिवली शहर प्रमुख), सौ किरण मोंडकर (महिला शहर संघटक), श्री. राहुल चौधरी (युवासेना शहर अधिकारी), श्री. बाळा म्हात्रे (उपशहर प्रमुख) श्री. तानाजी मालुसरे (उपशहर प्रमुख), श्री संजय पाटील (उपशहर संघटक), श्री. हेमंत म्हात्रे (उपशहर संघटक), श्री. रोहित म्हात्रे ( उपशहर संघटक), श्री. सुरेश परदेशी (उपशहर संघटक), किरण भोसले (विभाग प्रमुख), श्याम चौघुले (विभाग प्रमुख), राजेंद्र सावंत (विभाग प्रमुख) सुरज पवार (विभाग प्रमुख) नितीन पवार (विभाग प्रमुख), प्रमोद कांबळे (विभाग प्रमुख)हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली शिवसेना पश्चिम शहर शाखेच्यावतीने करण्यात आले असून हा कार्यक्रम आर. महल, महात्मा गांधी रोड, डोंबिवली स्टेशन समोर, डोंबिवली (पश्चिम ) येथे आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या डोंबिवली पश्चिम शाखेच्या सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी, शिवसैनिक, युवा शिवसैनिक यांनी केले आहे.