मुंबई: अंबरनाथ तालुक्याचा महसुली अभिलेखाचा लेखा – जोखा ठेवणारे उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, अंबरनाथ या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने सद्या ही इमारत जीर्ण झाली आहे. तसेच अपुऱ्या जागेमुळे या कार्यालयात अभिलेख ठेवण्याकरिता देखील जागा अपुरी पडत असून अनेक ठिकाणी छत गळत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे. यावर वारंवार होणारा खर्च टाळण्याकरीता व सदर कार्यालयीन इमारतीच्या ठिकाणी नवीन सुसज्ज अशी इमारत उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ४.५० कोटी रुपयांचा अंदाजपत्रकासह प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकानुसार आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यास याठिकाणी नवीन सुसज्ज अशी इमारत उभारणे शक्य होईल यामुळे येथील कर्मचाऱ्यांसह विविध शासकीय कामकाजाकरिता या कार्यालयात येणाऱ्या नागरीकांचा प्रश्न मार्गी लागू शकणार असल्याने याकामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात केली आहे.
