बुलढाणा: महार रेजिमेंटचा शौर्याचा इतिहास आहे व ही महार रेजिमेंट स्थापन करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वपूर्ण योगदान आहे असे मंत्रालयीन उच्च अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी बुलढाणा येथील महार रेजिमेंट स्थापना दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
१ऑक्टोबर २९२३ रोजी रविवारी गोल्डन पॅलेस या ठिकाणी महार रेजिमेंट स्थापना दिवस एक अपना उत्सव, संपन्न झाला, कार्यक्रमाची सुरुवात गांधी भवन इथून सैनिक सम्मान रॅली झाली सैनिक सम्मान रॅली मध्ये महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातील सैनिक सहभागी झाले होते, हि रॅली जेष्ठ समर्पित सैनिकांच्या सम्मानर्थ काढण्यात आली, रॅली शहरातून मुख्य रस्त्यानी महार रेजिमेंटच्या घोषणा करून विजय नगर येथील महार रेजिमेंट च्या पुतळ्या ला माल्यर्पण करून समूहाईक माणवंदना देण्यात आली,
आणि त्यानंतर रॅली समारोप यश सिद्धी सैनिक सेवा संघ,राष्ट्रीय छात्र सेना, रमाई च्या लेकी समूह, अनिकेत अकॅडमी चे विदर्थी सहभागी होऊन पथ संचालन केले, कार्यक्रम स्थळी महार रेंजमेंट चा ध्वजरोहन करण्यात आले,कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, मा, सिद्धार्थ खरात, सह सचिव गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य, मा, मिलिंद इनामदार, सिदनाक महार यांचे वंशज, मा, दादाभाऊ अभंग, जेष्ठ साहित्यिक, कर्णल सुहास जतकर, ऍड सुमित सरदार, सुबेदार मेजर रामभाऊ इंगळे साहेब, मा त्रंबक इंगळे साहेब,इत्यादी ना कु श्रुती ससाणे आणि कु जागृती यांनी मान्यवरांना व शहीद परिवाराला पायलटिंग करून सैनिकी शिस्तीत स्वागत केले, कार्यक्रमाची सुरुवात गायिका सुजाता लहाने यांनी मेरे वतन के लोगो या स्फूर्ती गीता ने सुरुवात झाली शहीद परिवार यांचा सम्मान करण्यात आला, तसेच जेष्ठ सैनिक, यांचा सुबेदार रामजी सपकाळ जीवन गौरव सम्मान करण्यात आला, तसेच समस्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला, तसचे जिल्ह्यातील पत्रकार बंधुचा सत्कार करण्यात आला, तुम्ही देशाची उभारणी केली,व देशाचे रक्षण केले, आता निवृत्ती नंतर आपण अश्या प्रकार चे कार्यक्रम घेऊन सैनिकांनी समाज उभारणी चे कार्य हाती घ्यावे, आणि शैक्षणिक सामाजिक कार्यात आपण पुढे यावे कारण सैनिकांमध्ये निष्ठा, प्रामाणिकता, कर्मठता असते आणि सामाजिक चळवळी ला सैनिकांनी बळ द्यावे, असे शुभेच्छा पर संदेश देताना मा, सिद्धार्थ खरात साहेब यांनी केले, तसेच मा दादभाऊ अभांग, यांनी महार सैनिकांचे शौर्य आणि त्या शौर्या चे प्रतीक जय स्तंभ याचे अस्तित्व संरक्षित करणे हे आता सैनिकांचे कार्य आणि कर्तव्य असे अमूल्य प्रेरणादायी मार्गदर्शन केले, मा, मिलिंद इनामदार साहेब यांनी संभाजी महाराज यांचे इतिहासातील दाखले देऊन शौर्य ची जाणीव करून दिली, कार्यक्रमात चिमुकल्याणी सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार, अनिल डोंगरदिवे, कु शगुन डोंगरदिवे यांनी केले,कार्यक्रमाचे यशस्वीते साठी, यश सिद्धी सैनिक सेवा संघा चे संयोजक अनिल डोंगरदिवे, गुलाब मिसाळ, जि इंगळे, विद्यासागर डोंगरदिवे, शंकर हिवाळे, श्रीराम जाधव,मदन बिबे, विजय राऊत, प्रकाश वाघ, समाधान मोरे, मधुकर खरे,गणेश साळवे,गजानन मिसाळ, विजय सुर्भे, शिवाजी मोरे, विनोद डोंगरदिवे, इत्यादी ने श्रम घेतले.
