कल्याण: कल्याण (पूर्व)चे आमदार गणपतशेठ गायकवाड यांचा प्रत्येक रविवारी मतदारसंघातील मतदारांसाठी जनता दरबार त्यांच्या कल्याण (पूर्व) च्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केला जातो. या जनता दरबारातमध्ये कल्याण पूर्वचे तसेच इतरही भागातील अनेक नागरिक आमदार गणपत गायकवाड यांना त्यांच्या समस्या, प्रश्न, मागण्या घेऊन भेटायला येतात. आमदार गणपत गायकवाड हे नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना म्हणून संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्या अधिकाऱ्यांना सूचना देतात तसेच अनेक नागरिकांना ते त्यांचे पत्र देऊन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या नागरिकांचे प्रश्न त्यांच्या समस्या तात्काळ तिथेच्या तिथे दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक पुरुष, महिला, तरुण, तरुणी, मित्र मंडळ, संस्था, संघटना त्यांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन आमदार गणपत गायकवाड यांना भेटायला येतात आणि त्यांच्या ज्या मागण्या किंवा प्रश्न असतील त्यांच्या मागण्या अथवा प्रश्न ताबडतोब त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक रविवारी आमदार गणपत गायकवाड त्यांच्या कल्याण पूर्व मतदार संघातील नागरिकांच्या प्रश्नासाठी जनता दरबार आयोजित करून मतदार संघातील प्रश्न समस्या किंवा नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रामाणिक प्रयत्न करीत असतात.
आज रविवार दिनांक १५/१०/२०२३ रोजी आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक नागरिकांनी जनता दरबार मध्ये येऊन आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे प्रश्न समस्या मांडल्या आमदार गणपत गायकवाड यांनी तात्काळ सर्व उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या समस्या व प्रश्न सोडवण्याचा तात्काळ प्रयत्न केला.
आमदार गणपत गायकवाड हे प्रत्येक जनता दरबारामध्ये त्यांच्या मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून विद्यार्थ्यांना धनादेश देतात व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलतात. आमदार गणपत गायकवाड यांचे हे कार्य गेले चौदा वर्षे अविरत सुरू असून त्यांच्या या कार्याचे मतदारसंघात मोठ्या प्रमाणत कौतुक केले जाते. आमदार गणपत गायकवाड हे जनता दरबाराच्या माध्यमातून मतदारसंघातील आपल्या मतदारांशी, नागरिकांशी सतत संपर्कात राहात असल्याने त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे हे त्यांचे समर्थक व विरोधकही मान्य करतात…
