युवा नेते वैभव गणपत गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती…

Share

कल्याण : कल्याण जिल्ह्यातील युवा नेते श्री. वैभव गणपत गायकवाड यांची युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्षपदी भभारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ व मान्यवर नेत्यांच्या उपस्थित नियुक्ती करून त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. वैभव गणपत गायकवाड हे मागील काही दिवसापासून कल्याण जिल्ह्यामध्ये युवकांचे प्रश्न, झोपडपट्ट्यांचे प्रश्न, चाळीतील रहिवाश्यांच्या प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न अशा वेगवेगळ्या प्रश्नांसाठी युवकांना सोबत घेऊन संघर्ष करत होते, आंदोलन करीत होते. युवा मोर्चाच्या माध्यमातून ते जे काम करीत होते याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी वैभव गणपत गायकवाड यांची युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. व तसे नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते वैभव गणपत गायकवाड यांना देण्यात आले. वैभव गणपत गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सांगितले की माझ्यावर जी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती मी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन. कल्याण जिल्ह्यामध्ये नागरिकांचे तसेच मुख्यतः युवकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन भाजपा मजबूत करील. वैभव गणपत गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांचे अनेकांनी स्वागत केले व त्यांना भावी त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन कल्याण पश्चिमेतील मंगेशी हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी माननीय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री मा.ना. कपिल पाटील, माजी मंत्री व भाजपाचे जेष्ठ नेते श्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई चौधरी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. निखिल चव्हाण, भाजपा कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील, भाजपा टिटवाळा मंडल अध्यक्ष श्री.शक्तीवान भोईर यांच्या सोबत भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *