अंबरनाथ येथे होणाऱ्या ठाणे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.हसन मुश्रीफ यांच्या दालनात आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यासह घेतली आढावा बैठक…..

Share

मुंबई :मागील चौदा वर्षे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी अथक मेहनत घेत आहे. आज दि.१७ ऑक्टोबर रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ साहेब यांच्या दालनात अंबरनाथ येथे होणाऱ्या ठाणे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.. सदर बैठकीत ईमारत व वस्ती गृह बांधण्याबाबत आढावा, येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरु होणाऱ्या प्रवेशाबाबत नियोजन, पदनिर्मिती, जमीनचा ताबा घेणे, नेमलेल्या डीनना सध्या पूर्ती निधी उपलब्ध करून देणे ह्या विषयांचा आढावा घेण्यात आला. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विकासाच्या कामाबद्दल अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात सगळीकडे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *