कल्याण (पूर्व) चे आमदार गणपत गायकवाड यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी घेतली कल्याण -डोंबिवली आयुक्तांची भेट….

Share

कल्याण: कल्याण (पूर्व ) विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, नागरी विकास कामे, प्रलंबित व प्रस्तावित कामे यासाठी कल्याण (पूर्व) चे आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त मा.श्री.भाऊसाहेबजी दांगडे (भाप्रसे) यांची कल्याण मनपा कार्यालयात भेट घेतली. आमदार व आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीत कल्याण पूर्वेतील महत्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करून तातडीने खालिल मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या.
कल्याण पूर्व येथील १०० फुटी रोड लगत रुग्णालया करिता (आरक्षण क्र. २८३) तसेच क्रीडासंकुला करिता आरक्षण क्र. २७९ आरक्षित जागेवर अद्ययावत रुग्णालय व क्रीडासंकुल उभारण्याकरिता जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून यासाठी लागणाऱ्या निधीसाठीचा प्रस्ताव तातडीने राज्यशासनाकडे सादर करणे, कल्याण पूर्वेतील सर्व मुख्य व उपरस्त्यांची विशेषत: १) चेतना शाळा ते नेवाळी नाका श्री मलंग रस्ता २) गावदेवी मंदिर ते मोर्या नगरी रस्ता ३) काटेमानिवली नाका ते हनुमान नगर, शंकर पावशे रोड ४) चिंचपाडा कमान ते चिंचपाडा गाव या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करणे, कल्याण पुर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार परिसरामधील पाणी समस्या तसेच अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकणे व जलकुंभ बनविण्याच्या कामात होत असलेल्या अक्षम्य दिरंगाई बाबत, तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप २४ मीटर (८०फूट) रस्त्याच्या कामाबाबत, कल्याण पूर्वेतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग क्र.१०० तिसगाव गावठाण, गावदेवी मंदिरा शेजारी जलकुंभ बनविणे, कल्याण पूर्वेत विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार येथे पथदिवे बसविणेबाबत, श्रीमलंग रोड ते चिंचपाडा या १०० फुटी रोड मध्ये बाधित होणाऱ्या माधव अपा. या ईमारती मधील नागरिकांचे पुनर्वसन करणे अशा अनेक विकास कामावर सकारात्मक चर्चा झाली…आयुक्तांनी तात्काळ निर्णय घेण्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *