भीमा-कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण न्यायलयीन लढ्याला सर्वांनी साथ द्या…. दादाभाऊ अभंग

Share

राजेश खिल्लारे (अंबरनाथ)
अंबरनाथ: भीमा – कोरेगांव येथील येथील ऐतिहासीक जागेवर माळवदकर कुटुंबाने अतिक्रमण केले आहे या अतिक्रमणाचा व जागेचा मालकी हक्क याची न्यायलयीन लढाई सुरू असून या लढ्याला आपण सर्वांनी साथ द्या असे भीमा -कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी उपस्थितांना आवाहन केले.
मंगळवार दिनांक २४/१०/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत शाखा संबोधी बुद्ध विहारात ६७ वा धम्मचक्रप्रवर्तन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते माननीय शामदादा गायकवाड यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. २२ प्रतिज्ञा,धम्मदीक्षा, त्रिशरण, पंचशील बुद्धपूजा आयु.एम.पी. सपकाळे गुरुजी यांनी उपस्थित उपासक उपासिकांना सामुदायिक रित्या ग्रहण केले. यावेळी अशोक चीरिवेला यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली वर्तमानातील बहुजनांची परिस्थिती व धम्म बांधवांचे आद्य कर्तव्य याविषयी आदरणीय श्यामदादा गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी प्रत्येक बोद्धाने तन-मन-धनाने प्रयत्न करावे. खाजगीकरण,कंत्राटीकरण, नवीन शैक्षणिक धोरण याबाबत सफल अभ्यासपर पुढील आंदोलनाची दिशा कशी असेल याबद्दल त्यांनी जागृत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय दादाभाऊ अभंग यांनी बोलताना चळवळीचे गतिमानता, वर्तमान, भविष्य धम्मक्रांती, संस्कृती आक्रमण याविषयी सखोल अभ्यासपूर्ण प्रबोधन केले तसेच भीमा कोरेगाव आंदोलन जमिनीचा लढा इत्यादी बद्दल सविस्तर मार्गदर्शन करून या लढ्यात तरुणांनी पुढाकार घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे व लढा यशस्वी करावा अशी अपेक्षा ठेवून त्यांना उत्तम प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. या मंगल प्रसंगी अंबरनाथ शहरातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व बांधवांना मार्गदर्शन केले. समाजाकडून सामाजिक कार्याबद्दल भरीव कामगिरी केल्याबद्दल संस्थेतर्फे कार्यसम्राट आमदार माननीय डॉ. बालाजी किणीकर यांना या मंगल प्रसंगी समाजभूषण पुरस्कार 2023 देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी समाजासाठी जास्तीत जास्त योजना निधी आणून समाजाचे ऋण फेढायचे असे आश्वासन व्यक्त करून उपस्थित समाजबांधवांचे आभार मानून 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. समाज म्हणून सर्वांनी नेहमी एकत्र राहिले पाहिजे व येणाऱ्या संकटाचा एकजुटीने सामना केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. ज्येष्ठ बौद्धाचार्य एम.पी.सपकाळे गुरुजी यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या तथागत भगवान बुद्धांचा धम्म हाच शुद्ध जीवन परिवर्तन करण्याचा असून सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांच्या सखोल अभ्यासानंतर भगवान बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करून काळोखात असलेल्या समाजाला प्रकाशमान केले. संबोधी बुद्ध विहार परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व कार्यकर्त्यांना शभेच्छा दिल्या. सुरुवातीला सर्व महापुरुष व महामाता या आदर्शंना वंदन करून बुद्धवंदना आणि 22 प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले. आदर्श शिक्षक सिद्धार्थ मगरसर (मुंबई महानगरपालिका) आणि आयु. दिनेश सपकाळे (भारतीय रेल्वे) यांचा विशेष सत्कार आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास कमलाकर सूर्यवंशी (संपादक,अंबरनाथ टाइम्स) एड. संदीप भराडे (मा. पाणीपुरवठा सभापती अंबरनाथ) धनंजयदादा सुर्वे (राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस) चंद्रकांत गांगुर्डे (उपाध्यक्ष काँग्रेस मागासवर्गीय सेल) विलास डोंगरे साहेब (सामाजिक कार्यकर्ते) आयु.सोनवणे (संविधान प्रचारक) मा. अनिल गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते) एड.दिनकर मोरे (सरचिटणीस अंबरनाथ सामाजिक प्रतिष्ठान) मा. लताताई डोंगरे (महिला अध्यक्ष अंबरनाथ बुद्ध जयंती उत्सव मंडळ) आयु. नितीन वाघमारे (बार्टी, पुणे) भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव आयु.संतोष पगारे यांनी उत्कृष्ट निवेदन करून शेवटी आभार प्रदर्शन केले . राजेश खिल्लारे (पत्रकार ,लॉर्ड बुद्धा टीव्ही) यांनी बहुमूल्य योगदान दिले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विहाराचे सचिव आयु.प्रकाश कोरके आणि खजिनदार आयु. किरण कांबळे यांनी खूपच मेहनत करून कार्यक्रम यशस्वी आयोजित केला. कार्यक्रमाचे आयोजन भगवान शंकर टपाल आणि संपूर्ण परिवार यांनी सर्वांचे आभार मानले व शेवटी अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *