डोंबिवलीतील एम.आय.डी. सी.मधील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी एम.आय.डी. सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाईचे दिले आदेश….

Share

नागपूर: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये अनेक कंपन्या असून या डोंबिवली एमआयडीसी मध्ये या कंपन्यांनी व दुकानदारांनी अनाधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे केली आहे ही सर्व अतिक्रमणे एमआयडीसीचे अधिकारी व भूमाफिया तसेच कंपनीच्या व दुकानदारांच्या मालकांच्या माध्यमातून झाली आहेत व सध्याभी सुरू आहेत. बोगस कागदपत्रे बनवून अनेक भूमाफियांनी एमआयडीसीच्या जागांवर अनाधिकृत बांधकामे करून कब्जा केला आहे. दुकाने, इमारती, गोडाऊन, गॅरेज अशी अनाधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे केली आहेत. डोंबिवली एमआयडीसीत अनेक कंपन्यांनी त्यांना दिलेल्या जागेच्या क्षेत्रफळापैकी अनेक ठिकाणी कंपनीचे वाढीव बांधकाम केलेले असून यात कंपन्याच्या आजूबाजूला व टेरेसवर पत्रे टाकून त्याचा वापर व्यवसायासाठी करीत आहे. अशा प्रकारचे कंपन्यांनी आपल्या प्लॉटमध्ये अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामे केली आहेत. एमआयडीसीमध्ये एमआयडीसीच्या दुकानदारांनी आपल्याला दिलेल्या जागेच्या क्षेत्रफळापेक्षा अधिकचे अतिक्रमण बांधकाम करून दुकानांच्या वाढीव क्षेत्र तयार करून अनाधिकृत बांधकामे केली आहेत. तसेच अनाधिकृत दुकाने, टपऱ्या, छोटी-मोठी बांधकामे अशा प्रकारचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने येथे भूमापियांनी अनेक अनाधिकृत बांधकामे केली आहेत तसेच अतिक्रमणे केली आहे. खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून येथील एमआयडीसीची जागा बळकावून अनाधिकृत बांधकामे केलेली आहेत तरी या सर्व अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करण्यात यावी व सर्व अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे केली आहे ती निष्कासित करण्यात यावी असे पत्र उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांना ३१/८/२०२३ रोजी व डोंबिवली एम आय डी सी चे कार्यकारी अभियंता श्री.एस.पी. आव्हाड यांना १/९/२०२३ रोजी पत्र दिले होते. या पत्रावर कुठल्याही प्रकारची कार्यकारी अभियंता श्री आव्हाड यांनी कार्यवाही केली नाही. सदर पत्रावर कार्यवाहीची माहिती माहिती अधिकार कायद्याखाली मागितली पण ती सुद्धा देण्यात आली. माहिती दिली नाही म्हणून कार्यकारी अभियंता यांच्याकडे प्रथम अपील ४/१०/२०२३ रोजी केले पण दोन वेळा कार्यालयात बोलावून साहेब बाहेर गेले, साहेब राऊंड ला गेले, साहेबांची बैठक आहे, खासदार आले, आमदार आले साहेब तिकडे गेले असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. डोंबिवलीतील एमआयडीसी मधील माहिती अधिकारी माहिती अधिकाराखाली खोटी, अर्धवट व चुकीची माहिती देतात. अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपीलाची सुनावणी होऊन ही चार ते पाच महिने झाले तरी आदेश व माहिती देत नाही या सर्व अनागोंदी कारभाराची व डोंबिवली एम आय डी सी मधील अनाधिकृत बांधकामांवर व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेवून डोंबिवलीतील एम आय डी सी च्या सावळा गोंधळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी विनंती केल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एम आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *