अजित पवारांच्या मुलाचा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी दारुण पराभव का झाला असता? सामान्य माणसाला पडलेला भाबडा प्रश्न

Share

पुणे: लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी राजकीय नेते मंडळी आव्हाने, प्रति आव्हाने देऊ लागली आहेत. महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामना होण्याची शक्यता असून लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्याच आघाडीला यश मिळेल अशा प्रकारचं दोन्ही बाजूकडून दावा केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाविषयी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार अमोल कोल्हे यांना मी कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार. मुळात कुठलाही विषय नसताना केवळ जाणीवपूर्वक अजित पवारांनी हे विधान केले आहे. यावर खासदार अमोल कोल्हे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, अजित पवार हे मोठे नेते आहेत मला त्यावर भाष्य करायचं नाही. मी सामान्य कार्यकर्ता आहे. २/७/२०२३ पूर्वी ते माझे कौतुक करायचे दोन जुलै नंतर त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे माझी भूमिका तीच आहे. मी शिरूर लोकसभा मतदारसंघात काय काम केलेलं आहे ते मतदारांना माहीत आहे व उपमुख्यमंत्री अजित पवारांना ही माहिती आहे व त्यांनी नेहमीच माझे कौतुक केले आहे. दोन वेळा मला संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे मी काय काम केले आहे ते माझ्या मतदारसंघातील लोकांना माहित असल्याने अशा आव्हानांना मी मोजत नाही. लोकशाही आहे लोकशाहीत मतदार ठरवत असतो असे अत्यंत विनम्रपणे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
आता प्रश्न पडला आहे तो सामान्य माणसाला की अजित पवार बोलतात ते खरे की खोटे?? मागील निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदार संघात विजय शिवतरे यांना पाडणार असे एका जाहीर सभेत अजित पवार बोलले होते व शिवतारे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे अजित पवार सांगेल त्याचा पराभव होतो अशा प्रकारचं माध्यमाने चित्र रंगवलं परंतु वस्तुस्थिती तशी नाही. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप हे अत्यंत ताकदवान उमेदवार होते तर शिवतरे यांची निष्क्रियता यामुळे मतदार शिवतारे यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज होते म्हणून शिवतरे यांचा पराभव झाला होता ही त्या मागची खरी वस्तुस्थिती आहे. परंतु आपण सांगू त्याला जिंकु शकतो व आपण सांगू त्याला पाडू शकतो अशा प्रकारची हवा अजित पवारांच्या डोक्यात गेल्याने व माध्यमांनी तशी रांगवल्याने अजित पवार यांना असं वाटतं की मी सांगेलं त्याला पाडेल व मी सांगेन त्याला जिंकविन तस काही नाही. याच वर्षात चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार यांनी सर्व ताकद पणाला लावून ही त्यांच्या समर्थकांचा दारुण पराभव झाला होता. राजकारणामध्ये कुठल्याही मतदाराला कुठलाही नेता किंवा पक्ष विकत घेऊ शकत नाही. मतदार हा राजा असतो परंतु राजकीय नेत्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती असल्याने ते मतदारांना गृहीत धरत असतात पण मतदारांनी अनेक वेळा अशा मस्तीखोर नेत्यांना योग्य धडा शिकवला आहे.
जर अजित पवार यांची एवढी मोठी राजकीय ताकद आहे व ते खरोखरच एखाद्या उमेदवाराला पाडायचे की जिंकवायचे ठरवत असतील तर मावळ लोकसभा मतदारसंघ हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात च अजित पवार यांच्या मुलाचा पार्थ पवार यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी दारुण पराभव का झाला? सामान्य माणसाला पडलेला हा प्रश्न आहे. याचे उत्तर ना अजित पवार यांच्याकडे आहे ना त्यांच्या समर्थकांकडे….खासदार अमोल कोल्हे जिंकणार की नाही ते मतदार ठरवतील पण मी जे सांगेल तेच मतदार करतील ही सत्तेची नशा मतदारराजा उतरवल्याशिवाय राहणार नाही असे अनेकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *