कालकथित प्रतिभा अरुण पोवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन… ३जानेवारी २०२४ रोजी पुण्यानुमोदन दिन कार्यक्रम

Share


  पुणे:बामसेफ चिंचवड शहर युनिटचे क्रियाशील व सामाजिक कार्यकर्ते मा.अरुण पोवार साहेब यांच्या पत्नी मा.प्रतिभा अरुण पोवार यांचे दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सायं.६:०० वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर १ जानेवारी रात्री १२:००. वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी व सर्व सहयोगी संघटना पिंपरी चिंचवड शहर युनिटमधील सर्व कार्यकर्ते तसेच नातेवाईक,कार्यकर्ते उपस्थित होते.
     स्मृतीशेष प्रतिभा अरुण पोवार यांचा पुण्यानुमोदन दिनाचा धार्मिक कार्यक्रम बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बिन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रा.बाळासाहेब धावरे सर यांचे हस्ते दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांच्या राहत्या घरी सचिन गृहसंकुल श्रीमंगेश हाउसिंग सोसायटी बिल्डिंग, ए-७ नं.फ्लॅट नं.१११,कृष्णानगर चिंचवड, पुणे १९ या ठिकाणी करण्यात येणार आहे.
  बामसेफ व सर्व सहयोगी संघटनांचे पिंपरी चिंचवड शहर युनिटमधील सर्व कार्यकर्त्यांनी, सामाजिक व धार्मिक चळवळीतील कार्यकर्ते, नातेवाईक यांनी या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहवे अशी विनंती पोवार कुटुंबीयांनी सर्वांना केली आहे.
स्मृतिषेश प्रतिभा अरुण पोवार यांच्या मागे पती अरुण पोवार व प्रज्ञा अक्षय लोखंडे व प्राची या दोन मुली,जावई अक्षय लोखंडे व इतर नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *