चेंबूर: कोरेगाव भीमा येथील शौर्याचे प्रतीक असलेला ऐतिहासिक जयस्तंभ ही राष्ट्रीय संपत्ती असून ती आंबेडकरी चळवळीची अस्मिता आहे. ती राष्ट्रीय संपत्ती आहे कुणाची ही खाजगी मालमत्ता नाही. काही घुसखोर ही आमची खाजगी मालमत्ता आहे असे सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे आहे हा संभ्रम दूर करण्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती अभियान राबविणे आवश्यक असून घुसखोरांचां पर्दाफाश केला पाहिजे. कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ हे शौर्याचे प्रतीक असलेला ऐतिहासिक जयस्तंभ असून तिथे माळवदकर कुटुंबाने अतिक्रमण केले असून त्या विरोधात न्यायालयांमध्ये लढा सुरू आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने मी त्यावर अधिक भाष्य करीत नाही. आपण संविधानिक न्यायालयावर विश्वास ठेवूया आपल्यालाच न्याय मिळेल असा विश्वास भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी चेंबूर येथील दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या जनजागृती अभियानात व्यक्त केला. चेंबूर येथील विपश्यना बुद्ध विहारांमध्ये चेंबूर मधील लढाऊ तरुणांनी भिमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण संविधानिक न्यायालयीन लढा जनजागृती अभियाना अंतर्गत अभियान राबविण्यात आले त्यात दादाभाऊ अभंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास, भीमा कोरेगावची लढाई व कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील झालेले अतिक्रमण आणि न्यायलय लढा याची विस्तृत माहिती सांगून या लढ्यामध्ये आंबेडकरी जनतेने तन, मन व धनाने सामील होऊन संपूर्ण महाराष्ट्रात या संवेदनशील व अस्मितेच्या विषयाची जनजागृती करावी असे आवाहन उपस्थितांना केले. सर्व उपस्थितांनी दोन तास दादाभाऊ अभंग यांचे मनोगत अत्यंत शांतपणे ऐकल्याबद्दल दादाभाऊ अभंग यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रथम पंचशील व बुद्ध वंदना घेऊन बौद्धाचार्य भरत अमृता गायकवाड यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विद्रोही कवी बबन सरवदे यांनी केले. या कार्यक्रमात आदिनाथ हिरवे, मंगेश आव्हाड, मानव शिदू ढोणे, सुहास सरवदे, मोहन कांबळे, संजयदादा शिंदे, सार्थक भुजबळ, भीमराव आनंदा आढाव यांनी तन मन धनाने साथ देणार असे सांगून प्रत्यक्ष या लढ्यात कृतीने साथ दिली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आंबेडकरी चळवळीतील लढाऊ तरुण नेत्या जयाताई बनसोडे, आंबेडकरी चळवळीतील युवा नेते बाळराजे शेळके, संजयदादा शिंदे, लहू कांबळे, मोहन सोनवणे, विलास काळे, राज वाघमारे, बौद्धाचार्य मंगेश आव्हाड होते.
कार्यक्रमाला महावीर कांबळे, अनिल बैले, सुनील खैरनार, राज त्रिभुवन, संतोष साळवे, सचिन भुजबळ, सिद्धार्थ सुर्यगंध, मानव ढोणे, सुहास सरोदे, भीमराव आढाव, मोहन कांबळे,भीमराव सावंत, तानाजी कांबळे, निखिल गांगुर्डे, दीपक आढाव, दिनेश दिवेकर, नरेंद्र कांबळे, पांडुरंग बेले, आशिष कांबळे, अनुकूल इंगळे, अभिषेक इंगळे, वैभव गवारे, प्रतीक जाधव,आदित्य हाके, धम्मदीप कदम, रोहित कांबळे संदीप कांबळे, वैभव गवळी, पृथ्वीराज इंगळे, प्रथमेश वाघमारे, अविनाश बेले, योगेश शिंदे, राजेंद्र वाघमारे, सुमित दहिभाते, भीमराव कांबळे,निलेश भुजबळ, वेदांत कांबळे, देवेंद्र संजय शिंदे, सोनू बाजीराव लहाने, राम जगन्नाथ खरे, देवेंद्र गायकवाड, एडवोकेट अजय गायकवाड डॉक्टर सौरभ विलास गांगुर्डे आधी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी तृषभ आव्हाड,सुमेध गरुड,जयेंद्र गायकवाड,आकाश किरतकर,अक्षय देठे,संतोष साळवे, मयूर खांबे यांनी प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. जनजागृती अभियान आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सिद्धार्थ कॉलनी येथून सुरू झाल्याने त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल असा विश्वास महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध विद्रोही कवी बबन सरवदे यांनी व्यक्त करून हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व तरुणांचे कौतुक करून आभार मानले व असेच जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेने राबवावे असे आवाहन केले.
