….
मुंबई : कोरेगाव भीमा येथे माळवदकर कुटुंबाने ऐतिहासिक जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागेवर अतिक्रमण केले असून त्या अतिक्रमणाच्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग समितीच्या माध्यमातून न्यायालय लढाई लढत आहे. ही न्यायालयीन लढाई संविधानिक मार्गाने लढली जात असताना ज्यांनी अतिक्रमण यांनी केलं त्या माळवदकर कुटुंबातील एका सदस्याने मागील आठवड्यात जयस्तंभ आमची खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारचे विधान केल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा संताप आणि संभ्रम निर्माण झालेला आहे. हा जयस्तंभ नेमका कुणाचा? हे जाणून घेण्यासाठी चेंबूर मधील सिध्दार्थ कॉलनी मधील काही तरुणांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ अतिक्रमण व न्यायालय लढा या विषयावर दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान ठेवलं होतं. त्या व्याख्यानाला सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. या जनजागृती अभियानामध्ये सामील झालेले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन सोनवणे हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी हे व्याख्यान ऐकल्यानंतर आपल्या मानखुर्द विभागात सुद्धा अशा प्रकारचे प्रबोधन करणारे व्याख्यान झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी केल्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन येत्या रविवारी दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी विश्वभूषण बुद्ध विहार,, बिल्डिंग नं. ६७ शेजारी, शिवम शाळेसमोर, लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द मुंबई ४३ येथे सायंकाळी ६.३० वाजता ‘कोरेगाव भीमा जयस्तंभ अतिक्रमण व संविधानिक न्यायालयीन लढा’ या विषयावर भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान ठेवले असून हा अस्मितेचा व गंभीर विषय समजून घेण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन सोनवणे, सर्जेराव कांबळे, तानाजी कांबळे, खंडीझोड साहेब, दादा उघडे, बाजीराव उबाळे, सुधाकर पारखे, रंगनाथ रणशेवरे, गमरे, हिम्मतराव मोरे, राज सुरवाडे, राज मेढे आणि सर्व लल्लुभाई कंपाऊंड मधील पुरुष आणि महिला सामाजिक कार्यकर्ते यांनी आवाहन केले आहे.
