.

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांनी अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणे केलेली असून एमआयडीसीच्या जागेमध्ये अनाधिकृत हॉटेल्स, दुकाने, गॅरेज टपऱ्या व इतर छोटी मोठी अनाधिकृत बांधकामे केली असून यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा पत्रव्यवहार अनेक वेळा मंत्रालयात तसेच कार्यकारी अभियंता डोंबिवली यांच्याकडे करण्यात आला होता मंत्रालयातून आदेश आले तरी डोंबिवली कार्यकारी अभियंता यांनी कुठलीही कारवाई न केल्या कारणामुळे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा अर्ज करून अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तोडण्यात यावी व याला संरक्षण देणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे मागणी पत्राद्वारे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री मा.ना. उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. मा. मंत्री यांनी सदर पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) यांना कारवाईसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर हा अर्ज प्रादेशिक क्षेत्रीय कार्यालय ठाणे यांच्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात आला होता. प्रादेशिक कार्यालयाने हा अर्ज डोंबिवली औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना कारवाईसाठी पाठवला पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून या अर्जावर काय कारवाई करण्यात आली अशा प्रकारचे माहिती अधिकाराखाली अर्जाद्वारे माहिती मागितली पण जन माहिती अधिकारी यांनी माहिती दिली नाही म्हणून प्रथम अपिलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता डोंबिवली विभाग यांच्याकडे अपील केले..वारंवार अपील घ्या अशी विनंती अपिलीय अधिकारी यांना केल्यावर त्यांनी ४/४/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता अपील आहे अशा प्रकारचे पत्र पाठवले व अपील तारीख निश्चित केली. माहिती अर्जदार जेव्हा अपील तारखेला डोंबिवली एम आय डी सी कार्यालयात गेले तेव्हा अपिलीय अधिकारी हजर नव्हते…विचारणा केल्यावर कळले की ते आले नाही. जर अपिलीय अधिकारी हजर राहणार नसतील तर तसे कळवणे गरजेचे होते… डोंबिवली एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार चालू असून माहिती अर्जावर माहिती न देणे, अपील अर्ज केल्यावर अपील न घेणे, अपील घेतले तर अपिलीय अधिकारी उपस्थित न राहणे..जर अपील घेतले असेल तर त्याचा निकाल प्रत न देणे अशा प्रकारचा सावळा गोंधळ कारभार डोंबिवली कार्यालयात सुरू असून त्याची तक्रार महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, उद्योग सचिव तसेच प्रादेशिक क्षेत्रीय कार्यालय (ठाणे) यांना करण्यात आली आहे..