ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन दिवा, कळवा व मुंब्रा येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.
प्रमुख मागण्या:
१) दिवा शहरासाठी स्वतंत्र जलपुरवठा योजना
२) अनधिकृत डंपिंग व बांधकामांवर कारवाई
३) स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP)
४) दिवा आगासन रोड वरील रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणंपुल बनविण्यात यावे.
५) कळवा DP मधील त्रुटींवर उपाय व पुनर्वसन
६) वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तातडीने उपाय
७) कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ICU व NICU तसेच आरोग्य सुविधांमध्ये वाढ करावी
आयुक्तांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले असून, सकारात्मक कृतीचे आश्वासन दिले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले.
यावेळी तात्यासाहेब माने, वैशालीताई दरेकर राणे, प्रतीक पाटील, अंकिता पाटील, सचिन पाटील, रोहिदास मुंडे, ज्योती पाटील, स्मिता जाधव, विजय कदम, खूरेशी शाईन घडीयाळी, लहू चाळके, रवींद्र सुर्वे, कल्पना कवळे तसेच सर्व विभाग व शाखा प्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
