महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दादाभाऊ अभंग यांचे कळवा (ठाणे) येथे ११ एप्रिल रोजी जाहीर व्याख्यान…

Share

ठाणे: चक्रवती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त कळवा येथे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार न्यास आणि संघर्ष यांच्यावतीने ९० फीट रोड, पारसिक नगर, खारेगाव कळवा (पश्चिम) ठाणे येथे प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषण तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे (रजी) अध्यक्ष आयु. दादाभाऊ अभंग यांचे रात्री ८.०० वाजता बहुजन नायकांचा स्वीकार सर्व समाजामध्ये होण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी काय प्रयत्न करायला हवेत या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या व्याख्यानासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार न्यास, खारेगाव, कळवा (ठाणे) या संस्थेचे पदाधिकारी, महिला मंडळ व सर्व सभासदांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *