१३४ किलोचा महाकाय केक या निमित्त सजवला जाणारभारतीय संविधानाचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्षाचे भव्य स्वागत
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती त्याचबरोबर भारतीय संविधानाचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष असा एकत्र दैदिप्यमान सोहळा वरळीच्या जांबोरी मैदानात मोठ्या जल्लोषात, अतिभव्य स्वरुपात शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ संध्याकाळी ५ वाजता साजरा करण्यात येणार आहे.भिमोत्सव समन्वय समिती वरळी-२०२५, व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त १३४ किलोचा केक, डोळयाचे पारणे फिटणारी आतषबाजी, या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे.
यासह *बॅालिवूडच्या ख्यातनाम स्टार, बालकलाकार अन्यना तांबे , भरत गणेशपुरे , गायक रूपकुमार राठोड , सुनाली राठोड, गायक संदेश विठ्ठल उमप, जगविख्यात गायक संजय सावंत जी, इंडियन ॲायडॅाल फेम मुकेश पांचोली , दिक्षा शिर्के, कबिर नाईकनवरे यांचे गायन व अत्युच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उपस्थितांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
संविधानाचे हे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष आहे ही घटना अजरामर करण्यासाठी १५०० गायक २० भाषांमध्ये संविधानाचे प्रस्ताविक , संगितमय सुरात गायन करून गिनिज बुक ॲाफ वर्ड रेकोर्ड चा विश्व विक्रम करणार आहेत , त्याचेच ३/४ भाषांतील प्रात्याक्षिक (सॅाफ्ट लॅांच) आपल्या या कार्यक्रमात होणार आहे !!!
विशेष म्हणजे महिला, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले व त्यांचे पालक यांना लाखोची बक्षिसे, पैठणी, सुटाचे कपडे, सोन्याची नथनी, चांदीचे नाणे, शालेय साहित्य, नऊवारी लुगडी, हजारो रूपयांचे गिफ्ट वाऊचर , लकी ड्रॉ च्या माध्यमातून महाराष्ट्र बाजार पेठ, दादर यांच्याकडून देण्यात येणार आहे.
तसेच *समिती व एन. एस. चेस अकादमी* यांच्या विद्यमाने समता चषक २०२५ ही राष्ट्रीय दर्जाची अशी बुद्धिबळ स्पर्धा गरीब मुलांसाठी शनिवार दि. १२ एप्रिल रोजी जांबोरी मैदानातील अंबिका माता भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सहकुटुंब मित्र परिवारासह उत्कृष्ठ पोशाख परिधान करून ठीक ५ वाजता हजर रहा असे आवाहान कार्यक्रमाचे समन्वयक डॅा विजय कदम यांच्याकडून करण्यात आले.

आपला
डॉ. विजय कदम,
समन्वयक