मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. हा न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांचा सहभाग असावा म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती १जानेवारी २०२५ रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे शौर्यदिनाचे औचित्य साधून स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष व शिरूर तालुका प्रभारी या पदावर वाल्मिक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाल्मिक चौधरी हे आंबेडकरी चळवळीत मागील अनेक वर्षे काम करीत असून ओबीसी चळवळीत ही अग्रेसर आहेत. वाल्मिक चौधरी हे ओबीसी असून ही सुरवातीपासून भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात सहभागी असून दादाभाऊ अभंग यांचे ते कट्टर समर्थक आहेत. भीमा कोरेगाव विजयस्तंभ या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात तन मन आणि आपले सर्वस्व लावून जनजागृतीचे काम करतील अशी अपेक्षा…त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

